महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट एबीला म्हणाला, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा... लवकरच भेटू - एबी डिव्हिलियर्सचा ३६ वा वाढदिवस

एबी डिव्हिलियर्सच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप सार आनंद मिळो तसेच चांगलं आरोग्यही, तुझ्या परिवारासाठी खूप प्रेम. लवकरच भेटू'

ab de villiers celebrating his 36th birthday here is how virat kohli wished him on twitter
विराट एबीला म्हणाला, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा... लवकरच भेटू

By

Published : Feb 17, 2020, 1:49 PM IST

Updated : Feb 17, 2020, 1:58 PM IST

मुंबई- क्रिकेट जगतात मिस्टर ३६० डिग्रीच्या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा आज ३६ वा वाढदिवस आहे. एबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्याचा सहकारी विराट कोहलीने एबीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप सारा आनंद मिळो तसेच चांगलं आरोग्यही, तुझ्या परिवारासाठी खूप प्रेम. लवकरच भेटू'

डिव्हिलियर्स आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सहकारी खेळाडू आहेत. या दोघांनी आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण यांना आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात यश आलेले नाही.

डिव्हिलियर्स जगभरात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावे सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आहे. त्याने केवळ ३१ चेंडूत शतक झळकावले होते. २०१८ च्या आयपीएलनंतर डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो नुकतीच पार पडलेल्या बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसला. दरम्यान डिव्हिलियर्स ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी निवृत्ती मागे घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Feb 17, 2020, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details