मुंबई- कोरोनामुळे जर टी-२० विश्वकरंडक स्पर्धा वर्षभर लांबणीवर टाकण्यात आली तर मी खेळेन की नाही, हे सांगता येणार नाही. सध्या मी उपलब्ध आहे. पण माझे शरीर त्यावेळी साथ किती साथ देईल, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. यामुळे मी या घडीला पुनरागमनाबाबत चुकीच्या आशा निर्माण करू शकत नाही, असे दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने स्पष्ट केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हीलियर्सने २०१७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. पण तो पुन्हा टी-२ विश्वकरंडकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो. याचे संकेत आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसीसने दिले आहेत. तसेच खुद्द डिव्हिलियर्सने देखील तसे संकेत दिले. पण आता खुद्द डिव्हिलियर्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तो म्हणाला, 'माझ्यावर बाऊचर यांचा मोठा प्रभाव आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो होतो. निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार कर हा सल्ला बाऊचर यांनीच मला दिला होता. पण माझा निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न असला तरी त्याबाबत चुकीच्या आशा निर्माण करणार नाही असे त्याने स्पष्ट केले.