महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

घरच्या मैदानावर इंग्लंडला असेल विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी - सुनील गावस्कर - 2019 World Cup

विश्वचषकाची सुरुवात ३० मेला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे

Sunil Gavaskar

By

Published : Mar 13, 2019, 4:52 PM IST

मुंबई - आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषकाचा थरार सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना अंनेकांनी विश्वचषकचा किताब कोण पटकावणार, स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार या बाबात आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मते इंग्लंडचा संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. गेले २ विश्वचषक हे यजमान संघानी जिंकले असून ही विश्वचषक स्पर्धा इंग्लंडच्या घरच्या मैदानांवर होणार असल्याने इंग्लंडचे पारडे तुलनेत जड असल्याचे गावस्कर म्हणाले.

विश्वचषकाची सुरुवात ३० मेला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत १९७९, १९८७ आणि १९९२ या साली विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details