नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. १९८३च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यावर कपिल देव यांनी व्हिडिओ पोस्ट करत आपली प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या सर्व जुन्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राऊझर घालून काढलेल्या या व्हिडिओत कपिल म्हणाले आहेत, "माझे ८३चे कुटुंब. वातावरण अल्हाददायक झाले आहे आणि मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी उत्सुक झालो आहे. माझी प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळेच मी लवकर ठिक होत आहे. ८३ चित्रपट कधी प्रदर्शित होईल माहित नाही मात्र, त्या अगोदरच मी तुम्हा सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करेल. आता आपण या वर्षाच्या शेवटाला आलो आहोत आणि मला विश्वास आहे की, येणारे वर्ष आपल्या सर्वांसाठी नक्कीच चांगले असेल."
गेल्या आठवड्यात झाली होती शस्त्रक्रिया -