मुंबई -आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या लिलावासाठी तब्बल ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. १९ डिसेंबरला कोलकाता येथे ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. आयपीएलने या नोंदणीची पुष्टी केली.
हेही वाचा -मेस्सीचं धूमशान...सहाव्यांदा पटकावला ‘बलोन डी ओर’ पुरस्कार
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी एक निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या अशा एकूण १९ भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या अशा ६३४ अशा भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तर, ६० खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलचा अनुभव आहे मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचा अनुभव नाही.
लिलावामध्ये एकूण ७३ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले २१५ खेळाडू भाग घेतील, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या ७५४ खेळाडूंनीही प्रथमच नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या १९६ विदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर असे ६० परदेशी खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप खेळलेले नाहीत.
या लिलावासाठी ऑस्ट्रेलियाचे ५५, दक्षिण आफ्रिकेचे ५४, श्रीलंकाचे ३९, न्यूझीलंडचे २४, इंग्लंडचे २२, वेस्ट इंडीजचे ३४, अफगाणिस्तानचे १९, बांग्लादेशचे ६, झिम्बाब्वेचे ३, नेदरलँड्स व अमेरिकेचा प्रत्येकी एक इत्यादी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.