नवी दिल्ली- टीम इंडियाचा माजी स्फोटक डावखुरा फलंदाज युवराज सिंह याने आजच्या दिवशीच एका षटकात ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. २००७ च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई केली होती. त्याचा हा विक्रम टी-२० क्रिकेटमध्ये कोणालाही अद्याप मोडता आलेला नाही.
१९ सप्टेंबर २००७ ला भारत विरुध्द इंग्लंड संघामध्ये आयसीसी विश्वकरंडक टी-२० स्पर्धेचा २१ सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने १७ षटकात ३ गडी बाद १७३ धावा केल्या होत्या. यावेळी मैदानात फलंदाजी करत असलेला युवराज सिंह, इंग्लंडचा अँड्रू फ्लिंटॉफ, स्टुअर्ट ब्रॉड आणि पॉल कॉलिंगवूड यांच्यात काही वाद झाला. त्यानंतर मात्र, युवराजचे डोके सणकले. त्याने १८ वे षटक घेऊन आलेल्या ब्रॉडची जी धुलाई केली ती धुलाई अद्याप ब्रॉड विसरू शकला नाही.
हेही वाचा -IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ
ब्रॉडला युवराजने केले ट्रार्गेट -
स्टुअर्ट ब्रॉडच्या शेवटच्या षटकात युवराजने पहिल्या चेंडूवर लॉगऑनवरुन षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिड विकेटवर युवीने षटकार लगावला. तिसरा चेंडू स्केअरलेगच्या प्रेक्षकात टोलावून युवीने षटकाराची हॅट्रीक पूर्ण केली.