महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मराठमोळा क्रिकेटपटू अजित आगरकरचा पत्ता कट!

सीएसी सदस्य मदन लाल यांनी या बैठकीची माहिती दिली. या दोन पदांसाठी तब्बल ४४ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही समावेश होता.

5 selected for interview including Shiva, Chauhan, Prasad said madan lal
मराठमोळा क्रिकेटपटू अजित आगरकरचा पत्ता कट!

By

Published : Mar 4, 2020, 8:08 AM IST

मुंबई -बीसीसीआयच्या नव्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीसाठी तीन व्यक्तींना बुधवारी मुलाखतीसाठी बोलावले आहे. ही मुलाखत दोन पदांसाठी असणार आहे. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, फिरकीपटू सुनील जोशी आणि समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन, राजेश चौहान व हरविंदर सिंग यांचा समावेश आहे.

हेही वाचा -शेर आया शेर! हार्दिक पांड्याचं वेगवान शतक..

सीएसी सदस्य मदन लाल यांनी या बैठकीची माहिती दिली. या दोन पदांसाठी तब्बल ४४ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचाही समावेश होता. शिवाय, आगरकरची निवड निश्चितही मानली जात होती. मात्र, त्याला वगळण्यात आले आहे.

माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. यांची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांच्यासह माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details