ढाका - जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणार्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट संघातील प्रशिक्षक कर्मचार्यांच्या (कोचिंग स्टाफ) पाच सदस्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. 'मर्यादित षटकांचे प्रशिक्षक नील मकेन्झी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन कुक यांनी या दौऱ्यामधून आपली नावे मागे घेतली आहेत, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.
हेही वाचा -विनेश फोगाटची नवीन वर्षात दमदार कामगिरी, जिंकले सुवर्णपदक
या दोघांव्यतिरिक्त फिरकी सल्लागार डॅनियल व्हेटोरी आणि भारताचे श्रीनिवास चंद्रशेखरन यांनीही या दौर्यावर जाण्यास नकार दिला आहे. प्रशिक्षक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही या दौर्यावरून आपले नाव मागे घेतले आहे.