सेंचुरियन -२००७ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरूद्ध त्याने ही कामगिरी नोंदवली होती. आज याच ब्रॉडने आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीत महत्वाचा विक्रम नोंदवला. या दशकात स्टुअर्ट ब्रॉड ४०० कसोटी बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडच्या अगोदर, जेम्स अँडरसनने हा महत्त्वाचा टप्पा गाठला होता. येथील सुपरस्टोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ब्रॉडने या विक्रमाला गवसणी घातली.
हेही वाचा -हिंदू होता म्हणून पाकचे खेळाडू 'त्याला' त्रास द्यायचे; शोएब अख्तरने केली पोलखोल