महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानला धक्का...! इंग्लंड दौऱ्याआधी 'या' 3 खेळाडूंना कोरोनाची लागण - पाकिस्तान क्रिकेट प्लेयर कोरोना पॉझिटिव्ह

पीसीबीचे वैद्यकीय पथक या तिघांच्या संपर्कात आहे. यानंतर या तिन्ही खेळाडूंना स्व विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. संघातील इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांची लाहोर, कराची आणि पेशावर येथे सोमवारी चाचणी घेण्यात घेण्यात आली. मंगळवारी या चाचणीचा अहवाल येण्याची शक्यता आहे.

pcb
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

By

Published : Jun 23, 2020, 12:10 AM IST

Updated : Jun 23, 2020, 12:44 AM IST

हैदराबाद - इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान अशी या 3 खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.

पीसीबीचे वैद्यकीय पथक या तिघांच्या संपर्कात आहे. यानंतर या तिन्ही खेळाडूंना स्व-विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. तर संघातील इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांची लाहोर, कराची आणि पेशावर येथे सोमवारी चाचणी घेण्यात घेण्यात आली. मंगळवारी या चाचणीचा अहवाल येण्याची शक्यता आहे.

रावळपिंडी येथे रविवार पाच जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान अशी या 3 खेळाडूंची नावे आहेत. तर उस्मान शिनवारी आणि इमाद वसीम हे कोरोना निगेटिव्ह आढळले. पाकिस्तान संघ जून महिन्याच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान 3 टेस्ट आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत. यासाठी अनेक खेळाडू वेगवेगळ्या शहरांमध्ये सराव करत आहेत. लाहोर येथून 24 जूनला सर्व जण एकत्रित येणार आहेत. त्यानतंर संघ मैनचेस्टरला (इंग्लंड) रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 सदस्यांची टीम निवडण्यात आली होती.

तर या आधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार शाहिद आफ्रिदीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

Last Updated : Jun 23, 2020, 12:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details