महाराष्ट्र

maharashtra

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदा घडलं, अन् ते केलं टीम इंडियानं....

By

Published : Nov 18, 2019, 9:42 PM IST

भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेविरुध्द ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यात मयांक अग्रवालने विशाखापट्टनमच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना द्विशतक ठोकले. या खेळीत त्याने २१५ धावा केल्या. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुणे येथील दुसऱ्या सामन्यात नाबाद २५४ धावा झोडपल्या. याच मालिकेत शेवटच्या तिसऱ्या कसोटीत सलामीवीर रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदा घडलं, अन् ते केलं टीम इंडियानं....

नवी दिल्ली - कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजी सर्वोच्च स्थानावर आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण भारताचे फलंदाज लयीत आहेत. सलामीवीरच्या भूमिकेत संधी मिळालेल्या रोहित शर्माने संधीचे सोने केले. त्यानंतर त्याचाच दुसरा जोडीदार मयांक अग्रवाल यानेही अनेक दमदार खेळी करत संघातील स्थान मजबूत केले. दरम्यान, भारतीय फलंदाजांनी मागील चार सामन्यात एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. तो विक्रम म्हणजे, ४ सामन्यात ४ द्विशतक ठोकण्याचा. अशा पराक्रम भारतीय संघ सोडला तर कोणत्याही संघाला करता आलेला नाही.

भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेविरुध्द ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यात मयांक अग्रवालने विशाखापट्टनमच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना द्विशतक ठोकले. या खेळीत त्याने २१५ धावा केल्या. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुणे येथील दुसऱ्या सामन्यात नाबाद २५४ धावा झोडपल्या. याच मालिकेत शेवटच्या तिसऱ्या कसोटीत सलामीवीर रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेनंतरही भारतीय खेळाडूंनी हा धडाका कायम ठेवला आणि बांगलादेश विरुध्दच्या पहिल्या सामन्यात मयांकने द्विशतकी खेळी केली. या सामन्यात तो २४३ धावा काढून बाद झाला. ४ सामन्यात ४ द्विशतके हा भारतीय संघाचा विश्वविक्रम ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या १०० हून अधिक वर्षाच्या इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आलेली नाही.

मागील ४ कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज -

  • मयांक अग्रवाल - २१५ धावा, विशाखापट्टनम दक्षिण आफ्रिकेविरुध्द
  • विराट कोहली - नाबाद २५४ धावा, पुणे, दक्षिण आफ्रिकेविरुध्द
  • रोहित शर्मा - २१२ धावा, रांची दक्षिण आफ्रिकेविरुध्द
  • मयांक अग्रवाल - २४३ धावा, इंदूर बांगलादेश विरुध्द

ABOUT THE AUTHOR

...view details