महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

१५ वर्षाच्या शेफालीने सचिनच्या खास विक्रमाला टाकले मागे - शेफाली वर्मा न्यूज

या सामन्यात शेफालीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या १५ वर्ष आणि २८५ दिवसांत अर्धशतक ठोकणारी शेफाली सर्वात युवा तर,  टी-२० मध्ये सर्वात दुसरी तरुण महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

१५ वर्षाच्या शेफालीने सचिनच्या खास विक्रमाला टाकले मागे

By

Published : Nov 10, 2019, 8:12 PM IST

Updated : Nov 10, 2019, 8:24 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन -१५ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्माच्या तुफानी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर, भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा पहिला टी-२० सामना ८४ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा -ट्रक चालकाच्या मुलाची गरुडझेप, करमाळाच्या सुरज शिंदेची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड

या सामन्यात शेफालीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या १५ वर्ष आणि २८५ दिवसांत अर्धशतक ठोकणारी शेफाली सर्वात युवा तर, टी-२० मध्ये सर्वात दुसरी तरुण महिला क्रिकेटपटू ठरली आहे. कमी वयात अर्धशतक करण्याच्या विक्रमात शेफालीने क्रिकेटचा देव सचिनलाही मागे पछाडले आहे. सचिनने वयाच्या १६ वर्ष २१४ दिवसांत पहिले अर्धशतक ठोकले होते.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. शेफाली वर्माने ४९ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली. त्यात तिने ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. शेफालीला मराठमोळी स्मृती मानधनाची साथ लाभली. स्मृतीने ४६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. १८६ धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या विंडीजचा संघ २० षटकात ९ बाद १०१ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाज शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव या तिकडीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

Last Updated : Nov 10, 2019, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details