अहमदाबाद:आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या फायनल आणि क्वालिफायर दोन या सामन्यांसाठी अहमदाबादचे वातावरण गजबजले आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ रविवारी (29 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल 2022 चा फायनल सामना ( IPL 2022 Final Match ) खेळेल.
ऑनलाईन विकले जाणारे तिकीट खरेदी करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम ( Narendra Modi Stadium ) बाहेर लोक रांगा लावताना दिसत आहेत. स्टेडियमच्या बाहेर, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट ची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. फायनल आणि क्वालिफायर 2 सामन्यांची बहुतांश तिकिटे आधीच विकली गेली आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु जिंकेल, असा विश्वास काही प्रेक्षकांना ( Cricket fans statement before final match ) आहे. त्यामुळे फायनलमध्ये बंगळुरू आणि गुजरातची लढत होईल असा तर्क लावला जात आहे. गुजरातच्या जनतेला गुजरात टायटन्सकडून विजयाची अपेक्षा आहे, तर बाहेरचे लोक बंगळुरू संघाच्या बाजूने आहेत.