बंगळुरु :भारत विरुद्ध श्रीलंका संघात दिवस-रात्र कसोटी ( India v Sri Lanka Day-Night Test ) सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणांमध्ये तीन चाहते सुरक्षेचा भंग करत मैदानात घुसले. त्यापैकी एकाने विराट कोहलीसोबत सेल्फी ( Selfie with Virat Kohli ) काढण्यात यश मिळवले, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यांना बाहेर काढले.
ही घटना श्रीलंकेचा दुसरा डाव सुरु असताना आठव्या षटकात घडली. तेव्हा मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता ( Mohammed Shami was bowling ). त्यावेळी मोहम्मद शमीचा चेंडू लागल्याने कुसाल मेंडिस उपचार घेत होता. तेव्हा स्टार खेळाडू विराट कोहलीला जवळून पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तीन प्रेक्षक मैदानात घुसले.
मैदानात घुसलेल्यापैकी एक प्रेक्षक विराट कोहलीच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाला. तेव्हा विराट कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. जवळ पोहचलेल्या चाहत्याने आणि विराट कोहलीला सेल्फी घेण्यास विनंती केली. त्यानंतर विराट कोहली सेल्फी घेण्यासाठी तयार ( Virat Kohli ready to take selfie ) झाला, तेव्हा या चाहत्याचा आनंद गगनात मावेना. सेल्फी घेतल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्या चाहत्याला मैदानातून बाहेर काढले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात ( India first innings ) 252 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 109 धावा करू शकला होता. यानंतर टीम इंडियाने 9 विकेट्सवर 303 धावा करून दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 50 आणि श्रेयस अय्यरने 67 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 28 धावा केल्या होत्या. तसेच संघाला विजयासाठी अजून 419 धावांची गरज होती.