महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संकटात

श्रीलंकेत मंगळवारी २ हजार ५६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात ३८ लोक परदेशातून आले आहेत. श्रीलंकेत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका होणार की नाही, याबाबत सशांकता निर्माण झाली आहे.

By

Published : May 12, 2021, 4:26 PM IST

corona cases increasing-in sri lanka-indias-odi-and-t20-series-in-danger
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संकटात

मुंबई - भारतीय संघ जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. पण आता या दौऱ्याबाबत सशांकता निर्माण झाली आहे. श्रीलंकेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय संघाच्या दौऱ्यावर अनिश्चिततचे सावट निर्माण झाले आहे.

श्रीलंकेत मंगळवारी २ हजार ५६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात ३८ लोक परदेशातून आले आहेत. श्रीलंकेत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका होणार की नाही, याबाबत सशांकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उभय संघात १३ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तसेच ही मालिका विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा -भारताचा माजी गोलंदाज आर. पी. सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

हेही वाचा -भारताविरुद्धच्या WTC फायनलनंतर निवृत्ती घेणार 'हा' दिग्गज खेळाडू

ABOUT THE AUTHOR

...view details