मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात शुक्रवार (4 मार्च) पासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना पंजाब क्रिकेट असोशिएनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना आहे. त्यासाठी बऱ्याच आजी माजी दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीच्या आतापर्यंत विराटने भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीला त्याच्या 100 व्या कसोटी ( Virat Kohli 100th Test match ) सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहलीने 20 जून 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध सबिना पार्क येथे कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर विराट कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी ( Virat Kohli 99 Test matches ) सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 168 डावात 50.39 च्या सरासरीने आणि 50.68 च्या स्ट्राईक रेटने 7962 धावा केल्या आहेत.
ज्यामध्ये त्याने 27 शतकं आणि 28 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने 7 द्विशतकंसुद्धा झळकावली आहेत. यामध्ये तो 10 वेळा नाबाद राहिला आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे. तसेच त्याने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 896 चौकार आणि 24 षटकार लगावले आहेत.
विराट कोहलीच्या 100 व्या कसोटीपूर्वी आजी माजी दिग्गज खेळाडूंनी दिलेल्या प्रतिक्रिया -
1. सचिन तेंडुलकर ( Master Blaster Sachin Tendulkar ) -