महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Closing Ceremony : 4 वर्षांनंतर होणार आयपीएलचा समापन सोहळा, रणवीरसह अनेक सेलिब्रिटींची असणार उपस्थिती - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

बीसीसीआयने आयपीएल 2022 चा समारोप समारंभ ( Closing Ceremony of IPL 2022 ) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यावेळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप सोहळा ( Closing ceremony at Narendra Modi Stadium ) होणार आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार एआर रहमान यांच्याशिवाय क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

IPL 2022
IPL 2022

By

Published : May 11, 2022, 10:13 PM IST

मुंबई:आयपीएल 2022 मधून अशीच एक बातमी समोर येत आहे, जी प्रेक्षकांचा उत्साह वाढवणार आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022 चा समारोप समारंभ ( Closing Ceremony ) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा समारोप सोहळा होणार आहे. या सोहळ्यात संगीतकार ए आर रहमान, अभिनेता रणवीर सिंग यांच्याशिवाय क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.

वास्तविक, आयपीएलचा शेवटचा समारोप समारंभ 2018 ( Last closing ceremony of IPL 2018 ) मध्ये झाला होता. यानंतर कोरोनामुळे आयपीएलशी संबंधित कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. यावेळी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान, बीसीसीआय भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षाचा उत्सव अतिशय अनोख्या पद्धतीने साजरी करणार आहे.

एआर रहमान आणि रणवीर सिंग

आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे. हा समारोप सोहळा सुमारे 45 मिनिटांचा ( Closing ceremony of 45 minutes ) असेल. या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी मंडळाने एका एजन्सीवर सोपवली आहे. समारोप समारंभात भारतीय क्रिकेटचा प्रवासही दाखवला जाणार आहे.

भारतीय क्रिकेटचा सात दशकातील प्रवास -बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांनी सांगितले की, भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिनही या समारोप समारंभात साजरा करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटने गेल्या सात दशकांत जे काही प्राप्त केले आहे ते आणि त्याचा प्रवासही या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे. गांगुली म्हणाले की, अहमदाबादमधील अंतिम सामन्यासह आम्ही भारतीय क्रिकेटचा प्रवास एका खास शोद्वारे दाखवून देशाच्या 75व्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणार आहोत.

29 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार -आयपीएल 2022 चा पहिला क्वालिफायर सामना 24 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 25 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. तसेच, 27 मे रोजी क्वालिफायर 2 आणि टाटा आयपीएल 2022 चा अंतिम सामना ( Final match of Tata IPL 2022 ) 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

हेही वाचा -Dinesh Karthik Love Story : प्रेमात आणि मैत्रीमध्ये मिळाला धोका, परंतु प्रेमाने पुन्हा सावरले

ABOUT THE AUTHOR

...view details