मुंबई:आयपीएल 2021 दरम्यान, टी नटराजन कोविडची लागण झाल्याचे आढळल्यानंतर उमरान मलिकला ( Fast bowler Umran Malik ) संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्या काळात मलिकने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करून सर्वांनाच चकित केले. त्यानंतर मलिक हा संघाचा मुख्य गोलंदाज बनला आहे. त्याने आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजांवर दडपण आणले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरातकडून हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात उमरान मलिकलने पाच विकेट्स घेतल्या. त्यावर आता क्रिस लिनने उमरान मलिकबाबत मोठे वक्तव्य ( Chris Lynn Statement ) केले आहे.
भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी -ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टी-20 टाइम-आउट शोमध्ये लिन ( Australian cricketer Chris Lynn ) म्हणाला, "मलिक गेल्या तीन सामन्यांपासून खूप चांगली कामगिरी करत आहे आणि बुधवारी त्याने ज्या प्रकारे खेळ केला ते खरोखर प्रशंसनीय आहे. आयपीएलच्या या मोसमात तरुण आपली उत्तम कामगिरी दाखवत आहे. त्याचे क्रिकेट पाहता त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी, असे मला वाटते.
बुधवारी हैदराबादचा संघ गुजरातविरुद्धचा सामना पाच गडी राखून हरला. मात्र, हैदराबादकडून मलिकने सर्वोत्तम कामगिरी केली. तो 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो, तर कधी 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. त्याने शुभमन गिल, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांना क्लीन बोल्ड केले, तर हार्दिक पांड्याला शॉर्ट बॉल मारण्यास भाग पाडले, ज्यावर तो झेलबाद झाला.