हैदराबाद : आयपीएल 2022 या स्पर्धेला ( IPL 2022 tournament ) मार्च शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे पार पडला आहे. या लिलावात भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि मिस्टर आयपीएल हा अलसोल्ड राहिला आहे. त्याला कोणत्याच फेंचायझिंनी बोली लावली नाही. त्यानंतर आता चेन्नई संघाने त्याला एक खास ट्रिब्यूट दिला ( Tribute to Suresh Raina of Chennai ) आहे.
आयपीएल 2022 च्या लिलावात सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र, तरी देखील कोणत्याही फ्रेंचायझीने त्यांना खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही ( CSK did not bid Suresh Raina ). आता चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला ट्रिब्यूट दिले आहे. चेन्नई संघाने यासाठी एक ट्विट केले आहे.