महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CSKचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी कोरोना पॉझिटिव्ह

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

chennai-super-kings-batting-coach-mike-hussey-covid-positive
CSKचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 5, 2021, 5:07 PM IST

मुंबई - आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांना कोरोनाची लागण झाली आहे. हसी कोरोनाची लागण झालेले आयपीएलमधील पहिले विदेशी आहेत.

माईक हसी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली. यात देखील ते पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, हसीच्या आधी चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

बालाजी आणि हसी पॉझिटिव्ह आढळल्याने, चेन्नईचा संघ क्वारंटाईन झाला आहे. हसी देखील १० दिवसांसाठी दिल्ली येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले आहेत.

आयपीएलमध्ये कोरोनाग्रस्ताचा आकडा पोहोचला १३ वर -

आयपीएलमध्ये अमित मिश्रा, रिद्धिमान साहा, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात आता माईक हसीच्या नावाची भर पडली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत आयपीएलशी संबधित १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा -IPL २०२१ : आपल्या सलामीवीर जोडीदाराकडून यशस्वी जैस्वालला मिळालं खास गिफ्ट, पाहा फोटो

हेही वाचा -IPLच्या स्थगितीनंतर आता टी-२० विश्व करंडकावरही संकट; भारताऐवजी 'या' देशात स्पर्धा होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details