महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Rohit Support to Virat : कोहलीला संघातून वगळण्याच्या मागणीला कर्णधार रोहितचे चोख प्रत्युत्तर - कोहलीला रोहित शर्माचा पाठिंबा

भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर टीका केली होती. आता कर्णधार रोहित शर्माने कोहलीचे समर्थन करत चोख प्रत्युत्तर ( Rohit Sharma responds Kapil Dev criticism ) दिले आहे.

Rohit Support to Virat
Rohit Support to Virat

By

Published : Jul 11, 2022, 4:14 PM IST

नॉटिंगहॅम: भारताचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या टी-20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तज्ञांना फटकारले असून, या स्टार फलंदाजाच्या दर्जावर शंका घेतली जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. संघ व्यवस्थापन त्याला सपोर्ट करत ( Rohit Sharma support to Virat Kohli ) राहील. नोव्हेंबर 2019 नंतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरलेला कोहली इंग्लंडविरुद्धच्या दोन T20 सामन्यांमध्ये प्रभाव पाडू शकला नाही.

खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये कोहलीच्या फॉर्मवर प्रश्न ( Questions on Virat Kohli form ) उपस्थित केले जात आहेत. पाच महिन्यांनंतर तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. कोहलीच्या अनुपस्थितीत दीपक हुड्डासारख्या खेळाडूला संधी मिळाली, ज्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही हुड्डाला कोहलीच्या पुनरागमनानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांसारख्या दिग्गजांनी कोहलीच्या दीर्घकाळ खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांना तज्ञ का म्हणतात हे मला माहीत नाही -

रविवारी तिसर्‍या T20 नंतर पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, "संघात काय चालले आहे हे तज्ञांना माहित नाही. कोहलीच्या फॉर्मकडे कसा पाहतोय संघ? याबाबत रोहितला विचारले असता तो म्हणाला, आमच्यासाठी हे अजिबात अवघड नाही. कारण आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. तसेच हे तज्ञ कोण आहेत आणि त्यांना तज्ञ का म्हणतात हे मला माहीत नाही. मी समजू शकत नाही.

त्यांना संघात काय चालले आहे ते कळत नाही -

या अगोदर कपिल देव म्हणाले होते की, प्रतिष्ठेच्या आधारावर खेळाडूंची निवड करू नये आणि सध्याच्या फॉर्मच्या आधारावर खेळाडूंची निवड करावी. तसेच वॉन कोहलीला सल्ला देताना म्हणाला होता, की त्याने खेळातून तीन महिन्यांचा ब्रेक घ्यावा. रोहित म्हणाला, ते बाहेरून गोष्टी पाहत आहेत, त्यांना संघात काय चालले आहे ते कळत नाही. आमच्याकडे विचार करण्याची एक प्रक्रिया आहे, आम्ही संघ तयार करतो, आम्ही वाद घालतो आणि चर्चा करतो आणि त्यावर खूप विचार करतो.

आम्ही निवडलेल्या खेळाडूंना आम्ही पाठिंबा देतो. त्यांना संधी दिली जाते. बाहेरच्या लोकांना याची माहिती नसती. त्यामुळे आमच्या संघात काय चालले आहे हे जास्त महत्त्वाचे आहे, तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कोहलीच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतके ( 70 international centuries on Kohli name ) आहेत. रिकी पाँटिंग (71) आणि सचिन तेंडुलकर (100) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त शतके ठोकली आहेत. या स्टार फलंदाजाच्या स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असे रोहितचे मत आहे.

दोन वाईट मालिकेनंतर त्याचे योगदान विसरता कामा नये -

तो म्हणाला, जर तुम्ही फॉर्मबद्दल बोलत असाल तर प्रत्येकाच्या फॉर्ममध्ये चढ-उतार होतात. खेळाडूची पातळी खराब नाही. अशा कमेंट करताना आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. रोहित म्हणाला, माझ्यासोबत असं झालं, कुणासोबतही घडतं. यात नवीन काहीच नाही. एखाद्या खेळाडूने सातत्याने चांगली कामगिरी केली असेल, तर एक-दोन वाईट मालिकेनंतर त्याचे योगदान विसरता कामा नये.

हेही वाचा -Wimbledon 2022 Final : 21 वे ग्रँड स्लॅम जिंकत जोकोविचने फेडररला टाकले मागे, फोटोच्या माध्यमातून पहा विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details