हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 35 वा वाढदिवस ( Rohit Sharma Birthday ) आहे. रोहितच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहने ( Ritika Sajdeh ) सुद्धा त्याला वाढदिवसाच्या वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर रितीकाने रोहित सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
रितीकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पाच फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये मुलगी समायरा हिच्यासोबत रोहित मस्ती करताना दिसत आहे. या फोटोवर कॅप्शन दिले आहे की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा रो, सॅमी आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी खूप खूप धन्यवाद."