नागपूर : दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे ( Captain Rohit Sharma Storming Batting ) भारताचा दणक्यात विजय झाला, अशी भावना नागपूरच्या क्रिकेट फॅन्सने व्यक्त केली आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये दर्जेदार कामगिरी केल्यामुळे भारताने हा विजय मिळवला आहे. ( India has Achieved Victory Due to quality Performance ) अक्षर पटेलची गोलंदाजी आणि रोहीत शर्माची तुफान फटकेबाजी आणि दिनेश कार्तिकची विजयी चौकाराने भारताला सिरीजमध्ये बरोबरी साधता ( Dinesh Karthik Winning Finisher ) आली. नागपूरच्या क्रिकेट फॅन्ससोबत ( cricket fans of Nagpur ) आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत ( Cricket Fans of Nagpur Expressed Their Feeling ) केली.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा दणक्यात विजय :दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतातीय संघाने जोरदार विजय मिळवला. पावसामुळे मैदान ओले असल्याने सामना तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे मॅच प्रत्येकी आठ ओव्हरची खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा संघाने 5 गडी गमावून 90 धावा काढल्या. भारतीय संघाने चार बॉल शिल्लक असतानाच 91 धावांचे लक्ष प्राप्त करून मालिकेत एक-एक ची बरोबरी साधली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव : तब्बल अडीच तास उशिराने टी-20 मॅच सुरू झाली. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी एरोन पिंच आणि कॅमरिन ग्रीनची जोडी सलामी आली. पहिल्या ओवरमध्ये आक्रमक दिसत असलेल्या कॅमरिन ग्रीन रन आउट झाला. ग्रीन केवळ पाच धावा काढू शकला. त्यानंतर ग्रेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला. मात्र, तो खाते उघडण्यापूर्वीच फिरकीच्या जाळ्यात अडकून क्लीन बोल्ड झाला. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच ओवरमध्ये दोन विकेट घेतल्याने भारताची सुरुवात दमदार झाली.
अक्षर पटेलची भेदक गोलदांजी : अक्षर पटेलने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना सामन्याच्या सुरुवातीलाच तंबूत परतवले. अक्षरच्या दुसऱ्या ओवरच्या पहिल्या बॉलमध्ये टीम डेव्हिडचा त्रिफळा उडवला. एकीकडे विकेट पडत असताना एरोन पिंच दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. एरोन पिंच ३१ धावा काढून तंबूत परतला.