मुंबई:सीएसकेचा मुख्य वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या ( Fast bowler Deepak Chahar ) दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला आहे. कारण सीएसकेने मुख्य वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या गैर हजेरीत सुरुवातीचे चार सामने गमावले आहेत. त्याचबरोबर हा संघ 10 संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तसेच सीएसके संघाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. गोलंदाज दीपक चहर गंभीर दुखापतीमुळे तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होण्याची ( Chahar ruled out of IPL ) शक्यता नाही.
14 कोटी रुपयांना लिलावात विकत घेतलेला चहर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असा दावा सुपर किंग्जने नेहमीच केला होता. पण दुखापतीच्या तीव्रतेमुळे तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन दरम्यान त्याच्या पाठीची दुखापत बळावली ( Deepak Chahar back injury ) आहे . चहर एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे, जिथे तो फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी गेला होता.