नवी दिल्ली : नागपुर कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर भारताच्या नजरा शुक्रवारपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या कसोटीवर असणार आहेत. याशिवाय अव्वल फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण पुजारा त्याच्या कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला.
आजची ऑस्ट्रेलियाची फलंदाजी : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हीड वाॅर्नर, मार्नस लाबुनशेन, स्टेव्हन स्मिथ ट्रॅव्हीस हेड यांच्या महत्तपूर्ण विकेट गमावल्या आहेत. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 31 षटकांत 108 धावा केल्या. प्रथम आलेल्या डेव्हीड वाॅर्नरने 44 चेंडूत 15 धावा केल्या, तर मार्नस लाबुनशेन याने 25 चेंडूत 18 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टीव्हन स्मिथला आपले खाते उघडता आले नाही तो (0) भोपळ्यावरच पॅव्हेलिनमध्ये परतला. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडला 12 धावांवर शमीने झेलबाद केले.
उपहारानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी :भारताच्या गोलंदाजांनी कांगारूंना जेरील आणले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हेडला 12 धावांवर केएल राहुलद्वारा झेलबाद केले. त्यानंतर उमर ख्वाजा रविचंद्रन अश्विनने कर्णधार रोहित शर्माद्वारा झेलबाद केले. त्याने 81 धावांची शानदार पारी खेळली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीला अश्विनने कोहलीद्वारा झेलबाद करीत भोपळ्यावर घरचा रस्ता दाखवला. रविंद्र जडेजानेसुद्धा शानदार बाॅलिंग करीत दोन विकेट घेतल्या. त्याने कमिन्स आणि मर्फीला तंबूत धाडले. उरलेल्या तळातील फलंदाजांना शमीने क्लिन बोल्ड करून कांगारूंचा डाव संपुष्टात आणला
आजची भारतीय गोलंदाजांची कामगिरी : भारतीय गोलंदाजांनी आज कांगारूंना जखडून ठेवले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याची भेदक आणि फास्टर गोलंदाजीने आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जखडून ठेवले. त्यांने 9 षटकांत 41 धावा दिल्या, त्यात 3 मेडन टाकत 2 विकेट घेतल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन याने आपल्या फिरकीची कमाल कायम ठेवली आहे. त्याने 14 षटकांत 37 धावा दिल्या, तर त्यामध्ये 4 मेडन टाकून त्याने महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने डेव्हीड वाॅर्नरला झेलबाद करून आॅस्ट्रेलियाच्या संघाला पहिला सुरूंग लावला, त्यानंतर मार्नेस लाबुनशेन याला रविचंद्र अश्विनने पायचित करून पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्टिव्हन स्मिथला भोपळ्यावर रविचंद्रन अश्विनने झेलबाद केले, त्यानंतर शमीने हेडला झेलबाद केले.
फलंदाजांकडून अपेक्षा : नागपूर कसोटीत 120 धावा करणारा कर्णधार रोहित शर्मा वगळता भारताची आघाडीची फळी सध्या डळमळीत झाली आहे. केएल राहुल धावांसाठी झगडतो आहे. तर पुजाराकडून त्याच्या 100 व्या सामन्यात शानदार फलंदाजीची अपेक्षा आहे. विराट कोहलीकडून देखील त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्याची अपेक्षा आहे. जर श्रेयस अय्यर कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल तर भारतीय संघ त्याला या कोरड्या दिसणाऱ्या खेळपट्टीवर प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकतो. फिरकीविरुद्ध भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या अय्यरने सात कसोटीत ५६.७२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र यामुळे सूर्यकुमार यादवला स्थान मिळणे कठीण होऊ शकते.