हैदराबाद:भारताचा अनुभवी आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार फलंदाजी करत दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. कार्तिक आज त्याचा 37वा वाढदिवस ( Cricketer Dinesh Karthik Birthday ) साजरा करत आहे. त्याचवेळी, आज भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्य राजेश्वरी गायकवाड हिचा वाढदिवस ( Birthday of Women Cricketer Rajeshwari Gaikwad ) आहे. ती तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.
डीके आज 37 वर्षांचा झाला आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खूप खास आहे, कारण त्याने यंदा आयपीएलमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. त्याच्या जोरावर तो तीन वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करत आहे. दिनेश लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवताना दिसणार आहे.
दिनेश सध्या तामिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधार ( Dinesh Kartik Captain of Tamilanadu Team ) आहे. 2004 मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते. 300 हून अधिक टी-20 सामने खेळणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. 2007 मध्ये खराब फॉर्ममुळे दिनेशला कसोटी संघातून वगळण्यात आले. दिनेश 2018 ते 2020 या काळात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही होता. दिनेशच्या नावावर अनेक स्फोटक आणि संस्मरणीय खेळी असल्या तरी, फार कमी लोकांना माहीत आहे की, दिनेश कार्तिकने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी पहिला सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
उजव्या हाताचा फलंदाज कार्तिकने 2021-22 मध्ये ब्रिटिश चॅनल स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचक म्हणूनही काम केले. यादरम्यान भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर त्याने 2007 मध्ये निकिता वंजारासोबत लग्न केले आणि नंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2008 मध्ये, दिनेश 'एक खिलाडी एक हसिना' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये निगार खानसोबत दिसला होता. यानंतर, 2013 मध्ये, दिनेशने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी साखरपुडा केला आणि 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये, दिनेश दोन जुळ्या मुलांचा पिता झाला, ज्यांची नावे कबीर आणि जियान आहेत.