महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Rishikesh : विराट कोहलीने चाहत्यांना आश्रमात व्हिडिओ काढण्यापासून रोखले, म्हणाला.. - Virat Kohli in ashram

भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या ब्रेकमध्ये कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत वेळ घालवत आहे. आता कोहली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात पोहोचला आहे.

Virat Kohli Rishikesh
विराट आणि अनुष्का

By

Published : Feb 1, 2023, 9:00 AM IST

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या देशभरातील विविध आश्रमांत जाऊन संत आणि साधूंना भेटी देत आहेत. गेल्या महिन्यात अनुष्का आणि विराट वृंदावनमध्ये दिसले होते. त्यानंतर पती-पत्नीची ही जोडी नैनितालच्या नीम करौली धाममध्ये पोहोचले. आता हे जोडपे ऋषिकेशमध्ये दिसले आहे. तेथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात पोहोचले आहेत.

व्हिडिओ न घेण्यास सांगितले : विराट आणि अनुष्का ऋषिकेश येथील स्वामी दयानंद आश्रमात गेले तेव्हा तेथील विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोहली एका बॉलवर ऑटोग्राफ देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्याला घेरले आणि त्याचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तेव्हा कोहली अगदी हळूवारपणे 'भाई हा आश्रम आहे' असे म्हणाला. यानंतर त्याच्या चाहत्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करणे बंद केले.

विराट कोहलीला ब्रेक : या आधी विराट आणि अनुष्काचे अनेक फोटो समोर आले होते, ज्यामध्ये दोघे वृंदावन येथील आश्रमात पूजा करताना दिसत होते. अनुष्का आणि विराट वृंदावनला जाण्यापूर्वी नवीन वर्षासाठी दुबईला गेले होते. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जाणार्‍या टी-20 मालिकेचा भाग नसून त्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. कोहली सध्या क्रिकेटमधून मिळालेल्या ब्रेकचा फायदा घेत आहे. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे.

वृंदावन येथील आश्रमाला भेट : बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली यांनी वृंदावन येथील एका आश्रमाला भेट दिली होती. या दोघांसोबत त्यांची मुलगी वामिका कोहली होती. विराटने काळ्या टी-शर्ट, कॅप आणि पँटसह ऑलिव्ह ग्रीन जॅकेट घातले होते, तर अनुष्का काळ्या रंगाचे जाकीट आणि पांढरी टोपी घातलेली दिसत होती. त्यांनी आश्रमात तासभर ध्यान केले आणि आश्रमात ब्लँकेटचे वाटपही केले. नोव्हेंबर 2022 मध्ये, दोघांनी उत्तराखंडमधील बाबा नीम करोली यांच्या आश्रमालाही भेट दिली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची घोषणा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा :Rahul Dravid On Split Captaincy : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची विभाजित कर्णधारपदावर प्रतिक्रिया म्हणाले, मला...

ABOUT THE AUTHOR

...view details