महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेदानं कोरोनामुळं आई-बहिणीला गमावलं, कठीण काळात BCCI ने दिली साथ - वेदा कृष्णमूर्तीच्या आई आणि बहिणीचं कोरोनाने निधन

आई आणि बहिण यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर बीसीसीआयने वेदाची साधी विचारपूसही केली नव्हती, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांनी केला होता. पण बीसीसीआयने वेदाला कठीण काळात संपर्क केल्याचे समोर आले आहे.

Bereaved Veda thanks BCCI, Jay Shah for extending support
क्रिकेटर वेदानं कोरोनामुळं आई-बहिणीला गमवालं, कठीण काळात BCCI ने दिली साथ

By

Published : May 18, 2021, 8:51 PM IST

मुंबई -भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले. अशा कठीण काळात बीसीसीआय आणि त्याचे सचिव जय शाह यांनी वेदाला साथ दिली. यामुळे वेदाने बीसीसीआयसह शाह यांचे आभार मानले आहेत.

आई आणि बहिण यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर बीसीसीआयने वेदाची साधी विचारपूसही केली नव्हती, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांनी केला होता. पण बीसीसीआयने वेदाला कठीण काळात संपर्क केल्याचे समोर आले आहे.

वेदाने ट्विट करत बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानले आहेत. तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं की, मागील महिना माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी अंत्यत कठीण ठरला. माझ्या कठीण काळात बीसीसीआय आणि जय शाह यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला कठीण काळात साथ दिली. यामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छिते.

पुढील महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण या दौऱ्यासाठी वेदाची निवड झालेली नाही. दरम्यान, वेदानंतर प्रिया पूनियाच्या आईचे कोरोनाने निधन झालं आहे.

हेही वाचा -India Tour Of England : इंग्लंड दौऱ्यासाठी 'हा' शिलेदार झाला 'फिट'

हेही वाचा -BIG NEWS : डिव्हिलियर्सचे वादळ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घोंघावणार का?, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details