मुंबई - आयसीसी टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन भारतात करण्यात येणार होते. परंतु देशातील कोरोना स्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा यूएईला हलवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयशी बोलताना यंदाच्या टी-२० विश्वकरंडकाबाबत मोठे अपडेट दिले आहेत.
जय शाह म्हणाले, 'आम्ही भारतात होणारा टी-२० विश्वकरंडक स्पर्धा यूएईमध्ये हलवू शकतो. परिस्थितीवर आम्ही बारिक लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊ.'
उर्वरित आयपीएल यूएईत होणार...
बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईत खेळवण्याची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू करण्याच्या विचारात बीसीसीआय आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बीसीसीय यूएईला दुसरा पर्याय म्हणून विचार करत होती. ज्यात ओमानमध्ये पात्रता सामना खेळवण्यात येणार आहेत. बोर्डाने मागील महिन्यात खेळाडूंसाठी हॉटेलदेखील बूक केलं आहे आणि आयसीसीसोबत मिळून ओमान क्रिकेट बोर्डाशी संवाद साधला आहे. यूएईमध्ये आयपीएल संपल्यानंतर तात्काळ विश्वकरंडक घेतल्यास खेळाडूंना संघासोबत जोडणं जाणं सोप्प होईल, असे बीसीसीआयला वाटतं. दरम्यान, बीसीसीआयने टी-२० विश्वकरंडकाचे ठिकाण बदलल्याने, भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.
हेही वाचा -T२० World Cup : भारतात नव्हे तर 'या' देशात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम
हेही वाचा -९ चेंडूत पडल्या ५ विकेट, अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज, लॉर्ड्सवरचा थरारक सामना