महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Sourav Ganguly On Virat Step Down : विराटचा राजीनामा : सौरव गांगुली म्हणाले, विराट एक 'ग्रेट प्लेअर'.. निर्णय वैयक्तिक - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ट्विट

करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला ( Virat Kohli Step Down Test captain ) आहे. बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली ( Sourav Ganguly On Virat Step Down ) आहे.

विराट कोहली सौरव गांगुली
विराट कोहली सौरव गांगुली

By

Published : Jan 16, 2022, 4:01 AM IST

हैदराबाद - विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ( Virat Kohli Step Down Test captain ) आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही ट्विट करत कोहलीला 'वेल डन' म्हणत शुभेच्छा दिल्या ( Sourav Ganguly On Virat Step Down ) आहेत. विराट एक 'ग्रेट प्लेअर' आहे. असे म्हणत गांगुलीने आगामी काळात भारतीय टीमला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी विराट महत्वाचा सदस्य असेल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलंय गांगुलीच्या ट्विटमध्ये..

त्याचा (विराट कोहली) निर्णय हा वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा आदर करते. भविष्यात या संघाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तो एक महत्त्वाचा सदस्य असेल. विराटच्या नेतृत्वात भारतीय टीमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये बाजी मारली, असे बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने म्हटले ( Sourav Ganguly Tweet ) आहे.

ट्विट करत विराटचा राजीनामा

दरम्यान, विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी कर्णधारदाचा राजीनामा दिला ( Virat Kohli Step Down Test captain ) आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. यापुर्वी विराटने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही लांब करण्यात आले.

काय म्हटलं विराटने ट्विटमध्ये..

आपल्या ट्विट मध्ये विराट कोहली म्हणाला ( Virat Kohli Tweet ) की, "गेल्या सात वर्षात टीमला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी मी कठीण परिश्रम घेतले. मी माझे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र, कोणत्याही गोष्टीला त्या वळणावर आल्यावर थांबावे लागते. मला वाटते मला माझे कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या या प्रवासात अनेक चढ उतार आले. पण, कशाची कमी भासणार नाही, यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले. मी प्रत्येक गोष्ट 120 टक्के क्षमतेने देण्याचा विचार करतो. मात्र, माझ्याकडून ती गोष्ट साध्य होत नसेल तर मी माझ्या टीमची फसवणूक नाही करू शकणार. मी बीसीसीआयचे आभार मानतो, त्यांनी मला देशाच्या संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली. माझ्या पहिल्या दिवसापासून ज्या सहकाऱ्यांनी साथ दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी आभार मानतो. रवीभाई आणि मला पाठींबा देणारे हे रेल्वे गाडीच्या इंजिन सारखे राहिले. ज्यांनी सातत्याने कसोटी क्रिकेटला उभारी दिली आहे. शेवटी एमएस धोनीचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर कर्णधार म्हणून खूप विश्वास दाखवला. भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मला सक्षम समजले," असेही विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details