कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बुधवारी दुपारी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक आश्चर्यकारक ट्विट केले. ज्यामुळे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली होती. परंतु आता सौरव गांगुली यांनी आता कोणती नवीन इनिंग सुरु करणार आहे, याबाबत खुलासा केला ( BCCI president Sourav Ganguly Revealed ) आहे.
ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी राजकारणात येण्याचे काही स्पष्ट संकेत दिले नव्हते, सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले ( Sourav Ganguly tweet ) होते की, '1999मध्ये क्रिकेटसह माझा प्रवास सुरू केल्यापासून 2022 पर्यंत 30 वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. जे माझ्या प्रवासाचा एक भाग आहेत, मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मला आभार मानायचे आहेत. आज, मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे. जे मला वाटते की, कदाचित बर्याच लोकांना मदत होईल. मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायात प्रवेश करत असताना तुम्ही मला पाठिंबा देत राहाल अशी मला आशा आहे.