मुंबई : 2023 च्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) हजर होतील. (BCCI meeting with Rahul Dravid). बीसीसीआय T20 विश्वचषक 2022 मधील टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहे. (review indias performance in T20 World Cup). राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणारे व्हीव्हीएस लक्ष्मणही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
निवड समिती बरखास्त : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी मुंबईत ही बैठक होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती, परंतु अद्याप नवीन पॅनेल तयार करण्यात आलेले नाही.