मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. भारतीय अॅथलेटिकपटू या स्पर्धेसाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय क्रिकेटर्संनी या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यांनी खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन देखील देशवासियांना केले आहे.
बीसीसीआयने आज शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघातील खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मिताली राज, हरमनप्रीत कौर, हरलीन देवोल, जेमिमाह रोड्रिग्ज हे खेळाडू शुभेच्छा देताना दिसत आहेत.
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय अभिमानाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ देत आहे. खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे आणि ते स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. आपण एकत्र येऊन भारताला प्रोत्साहन देऊ, अशा आशयाचे कॅप्शन बीसीआयने या व्हिडिओला दिले आहे.