नवी दिल्ली: बीसीसीआयने ( Board of Control for Cricket in India ) या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांना रोख पारितोषिके ( Tokyo Olympic medal winners ) देण्यासाठी 4 कोटी रुपये खर्च केले. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत, भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या सदस्यांना क्रिकेट व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील खर्चाचा खुलासा केला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की बीसीसीआयच्या दस्तऐवजानुसार, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणार्या देशातील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बोर्डाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला 10 कोटी रुपयांची देणगी ( 10 crore donation to IOA ) दिली. तत्पूर्वी, मार्चच्या अखेरीस, भारतीय क्रिकेट बोर्डाने ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन आणि कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सदस्यांना आयपीएलच्या उद्घाटन सामन्यापूर्वी सन्मानित केले.