महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मोठी बातमी! वृद्धिमान साहाला धमकी देणे पत्रकाराला पडले महागात; BCCI ने केली कारवाई - बोरिया मुजूमदार मराठी बातमी

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला ( Wriddhiman Saha ) धमकी देणे पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आता बीसीसीआयने पत्रकार बोरिया मुजूमदारवर ( Boria Majumdar Banned For Two Years ) दोन वर्षाची बंदी घातली आहे.

Wriddhiman Saha
Wriddhiman Saha

By

Published : May 4, 2022, 5:50 PM IST

Updated : May 4, 2022, 9:31 PM IST

दिल्ली - भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला ( Wriddhiman Saha ) धमकी देणे पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. मुलाखत द्यायला नकार दिल्यावर क्रीडा पत्रकार बोरिया मुजूमदारने साहाला धमकी दिली होती. याप्रकरणी आता बीसीसीआयने बोरिया मुजूमदारवर मोठी कारवाई केली आहे.

वृद्धिमान साहाने फेब्रवारी 2022 मध्ये मुजूमदारने मुलाखतीसाठी धमकवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने पत्रकार मुजूमदावर दोन वर्षांची बंदी घातली ( Boria Majumdar Banned For Two Years ) आहे. तसेच, बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी ) देखील मुजूमदारवर कारवाई करण्याची विनंती करणार आहे. त्यामुळे मुजूमदारच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रवेश नाही मिळणार -बीसीसीआयने केलेल्या कारवाईनंतर मुजूमदार यांना भारतीय स्टेडियमवरती प्रवेश करता येणार नाही. त्याचसोबत भारतीय संघातील क्रिकेटपटूंना भेटता अथवा त्यांची मुलाखत मुजूमदारला घेता येणार नाही आहे. ही कारवाई दोन वर्षांसाठी असणार आहे.

काय आहे प्रकरण? - वृद्धिमान साहाने एक ट्विट करत स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यात 'मुलाखत दिली नाही आणि कॉल उचलला नाही. यापुढे तुझी मुलाखत कधीच घेणार नाही. केलेला अपमान मी लक्षात ठेवेन,' अशी धमकी मुजूमदारने ट्विटरवरुन दिली होती. त्यानतंर 'येवढी वर्षे भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानानंतर सुद्धा एका पत्रकाराकडून या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. देशातील पत्रकारिता कोणत्या स्तरावर गेली आहे,' अशी खंत वृद्धिमान साहाने व्यक्त केली होती.

हेही वाचा -GT vs PBKS : पंजाब किंग्जचा गुजरात टायटन्सवर आठ गडी राखून एकतर्फी विजय

Last Updated : May 4, 2022, 9:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details