मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकार व्हिसा देणार का? हा प्रश्न आयसीसीला पडला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तानी खेळाडू आणि मीडियाला व्हिसा देण्यासाठी भारत सरकार तयार झाल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसीला दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ आगामी टी-२० विश्व करंडकासाठी भारतात येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
आयसीसी आणि बीसीसीआयची बैठक पार पडली. यात सहभागी झालेल्या एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने न्यूज एजन्सीला या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. 'टी-२० विश्व करंडक ही एक जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू आणि मीडियाला भारतामध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या विषयावर आगामी काळात आणखी चर्चा होणार आहे.'
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी बीसीसीआयला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १ एप्रिल रोजी बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीत या विषयावर एक महिन्याच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन बीसीसीआयने दिले होते.
प्रेक्षकांना मिळणार का परवानगी -