नवी दिल्ली:बीसीसीआय वार्षिक मानधनाच्या करार यादीतून (BCCI ANNUAL CONTRACT) वरिष्ठ कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि आणि अजिंक्य रहाणे यांना डिमोट करणे जवळपास निश्चित आहे. एका न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, बीसीसीआयने ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या वर्षासाठी खेळाडूंना दिले जाणाऱ्या मानधनाच्या कराराची यादी तयार करण्यात आली. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांना ए मधून बी श्रेणीत स्थान दिले जाऊ शकते. त्याचबरोबर या दोघांप्रमाणे इशांत शर्माला देखील खराब कामगिरीमुळे बी श्रेणीत ढकलले जाऊ शकते.
तसेच असे सांगितले जात आहे की, मोहम्मद सिराजला (Bowler Mohammad Siraj) त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सी श्रेणीतून बी किंवा ए श्रेणीत प्रमोट केले जाऊ शकते. त्याचबरोबर मागील वर्षी अक्षर पटेलची कामगिरी सुद्धा चांगली राहिली होती. त्यामुळे त्याला देखील सी मधून बी श्रेणीत प्रमोट केले जाऊ शकते. मात्र बीसीसीआय उमेश यादवला सी श्रेणीत टाकू शकते. उल्लेखणीय म्हणजे अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरने (All-rounder Shardul Thakur) केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याला देखील प्रमोशन मिळू शकते.