महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

BCCI Announce T20 & Test Squad: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी 'दोन' भारतीय संघ जाहीर

बीसीसीआयने ( BCCI announces T20 and Test squad ) रविवारी इंग्लड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 मालिकेसाठी तीन दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर दिली आहे.

Indian Squad
Indian Squad

By

Published : May 23, 2022, 3:23 PM IST

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील थरार आता शेवटच्या आठवड्यात येऊन पोहचला आहे. या आठवड्यात आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा शेवट होणार आहे. त्यानंतर जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौर्‍यावर येणार आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे, जिथे मागील दौऱ्यातील कसोटी मालिकेतील एक सामना खेळणे बाकी होता. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दोन देशाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची ( Indian Test and T20 Team Announce ) घोषणा करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये बीसीसीआयने भारतीय संघातून रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली ( Virat Kohli ) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) यांना विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रोहित संघात नसल्यामुळे त्याच्या जागी भारताच्या टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी रिषभ पंतच्या हाती दिली आहे.


नवीन खेळाडूंना संधी -

विशेष म्हणजे या संघातून अनुभवी खेळाडूंना जरी वगळण्यात आले असले, तरी काही नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये पंजाब किंग्ज संघाचा हुकुमी गोलंदाज अर्शदीप सिंगला ( Bowler Arshadeep Singh ) समावेश आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगाचा बादशाह उमरान मलिकला ( Bowler Umran Malik ) संधी देण्यात आली आहे. तसेच या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.


टी-20 संघाची धुरा राहुलच्या हाती -

केएल राहुल ( KL Rahul Indian T20 Captain ) पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कारण, त्याने यापूर्वी कधीही भारतीय संघाचे टी-20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केलेले नाही. परंतु त्याने वनडे क्रिकेट सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. राहुलच्या टी-20 कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 56 टी-20 सामन्यात 40.68 च्या सरासरीने 1831 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत.


चेतेश्वर पुजाराचे कमबॅक -

भारतीय कसोटी संघाबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाचा अनुभवी फलंदाजी चेतेश्वर पुजाराने ( Batter Cheteshwar Pujara ) संघात पुनरागमन केले आहे. त्याला आणि अजिंक्य रहाणेला श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्याचबरोबर दोघांना रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुजाराने रणजी आणि काउंटी क्रिकेट शानदार कामगिरी केली. ज्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आली.


अजिंक्य रहाणेला वगळले -

तसेच अजिंक्य रहाणेला दुखापत ( Ajinkya Rahane Injured ) आणि खराब फॉर्ममुळे त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. भारतीय कसोटी संघात राजस्थान रॉयल्स संघासाठी शानदार कामगिरी करणार्‍या प्रसिद्ध कृष्णा कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तो लवकरच कसोटी संघात देखील पदार्पण करेल. मात्र त्याला भारताच्या टी-20 संघात संधी मिळू शकली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ -

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

हेही वाचा -Sunrisers Hyderabad VS Punjab kings : पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून केला पराभव, पण प्लेऑफमध्ये स्थान नाही

ABOUT THE AUTHOR

...view details