मुंबई :Under 19 Cricket World Cup : पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर १९ क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्यूनियर निवड समितीनं अंडर १९ आशिया चषक स्पर्धेत सहभागी संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. उदय सहारन टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर के सौम्य कुमार पांडे संघाचा उपकर्णधार असेल.
भारताला 'अ' गटात स्थान : १९ जानेवारी २०२३ पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन देशांच्या मालिकेत सहभागी होणार असून इंग्लंड तिसरा संघ आहे. सध्या टीम इंडिया १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. विश्वचषकात, पाच वेळच्या चॅम्पियन भारताला बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका यांच्यासोबत 'अ' गटात स्थान देण्यात आलंय. भारतीय संघ २० जानेवारीला ब्लोमफॉन्टेन येथे बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर संघ २५ आणि २८ जानेवारीला अनुक्रमे आयर्लंड आणि अमेरिकेविरुद्ध खेळेल.
त्रिकोणी मालिका आणि विश्वचषकासाठी एकच संघ : बीसीसीआयनं एक प्रेस नोट जारी करून म्हटलं की, 'त्रिकोणी मालिकेनंतर अंडर १९ संघ विश्वचषकासाठी तयारी करेल'. ११ फेब्रुवारीला बेनोनी येथे अंडर १९ विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. तिरंगी मालिका आणि अंडर १९ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे.