दिल्ली -टी 20 वर्ल्डकप काही महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) टी20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशीविरुद्ध मालिका खेळवण्याचे ठरवलं आहे. या दोन्ही संघासोबतच्या दौऱ्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर ( bcci announce schedule ) केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक - भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी20 सामना मोहालीत तर दुसरा नागपूर आणि तिसरा सामना हा हैदराबादमध्येह होणार आहे. पहिला सामना 20 सप्टेंबर, दूसरा 23 आणि तिसरा 25 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.