वेस्टविंडीज विरुद्ध T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( West Indies Vs India Team Announce ) आहे. दुखापतीतून सावरत रोहित शर्मातचे ( Captain Rohit Sharma ) संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याकडे दोन्ही संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विराट कोहली सुद्धा दोन्ही मालिकांमध्ये खेळताना दिसणार आहे. कुलदीप यादवला एकदिवसीय तर, युवा फिरकीपटू रवि बिश्नोईला टी 20 सामन्यात संधी देण्यात आली आहे.
लोकेश राहुल दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत संघात दाखल होईल. प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी यांना दोनही मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकामधील खराब कामगिरीमुळे रविचंद्रन अश्विनला वगळण्यात आले आहे. दुखापतीच्या कारणास्तव रविंद्र जाडेजा वेस्ट विंडीज मालिकेतून बाहेर राहणार आहे. दरम्यान, तीन एकदिवसीय आणि टी20 सामने अहमदाबाद आणि कोलकत्ता मध्ये खेळवले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच ठिकाणी सामने खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
टी 20 संघ -