ढाका: बांगलादेशचा सर्वात मोठा क्रिकेटपटू शाकिब अल हसन ( Cricketer Shakib Al Hasan ) पुन्हा वादात सापडला आहे. त्याच्या देशाच्या क्रिकेटबोर्डाने बेटिंग कंपनीच्या समर्थनार्थ त्याच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारतीय बुकीच्या भ्रष्ट ऑफरची तक्रार न केल्याबद्दल शाकीबवर एक वर्षाची बंदी घातली होती. बांगलादेशच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही प्रकारच्या बेटिंग प्रकरणाला प्रोत्साहन देणे किंवा समर्थन करणे प्रतिबंधित आहे.
शाकिबला कारणे दाखवा नोटीस देण्यात -
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड ( Bangladesh Cricket Board ) अष्टपैलूच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करेल. ज्यामध्ये त्याने 'बेटविनर न्यूज' ( Betwinner News ) नावाच्या कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली होती. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले की, शाकिबला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. शाकिबने जवळपास 400 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 12,000 हून अधिक धावा आणि 650 विकेट्स घेतल्या आहेत.