महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

काही वर्ष अमेरिकेसाठी खेळू इच्छितो - उन्मुक्त चंद

उन्मुक्त चंदने आयएएनशी बोलताना त्याच्या भविष्यातील योजनांविषयी सांगितलं. वाचा काय म्हणाला उन्मुक्त चंद...

batsman-unmukt-chand-said-looking-to-play-for-usa-in-a-couple-of-years
काही वर्ष अमेरिकेसाठी खेळू इच्छितो - उन्मुक्त चंद

By

Published : Aug 19, 2021, 8:08 PM IST

मुंबई - उन्मुक्त चंद सद्या चर्चेत आहे. त्याने अचानक भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. तो आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार आहे. उन्मुक्तने आयएएनशी बोलताना त्याच्या भविष्यातील योजनांविषयी सांगितलं. वाचा काय म्हणाला उन्मुक्त चंद...

प्रश्न - तु भारतामधील तुझ्या करियरकडे कसे पाहतो?

उत्तर - भारतातील माझा प्रवास चांगला राहिला. मी अंडर-15, अंडर-17, अंडर-19 पासून रणजी करंडक, आयपीएल, इंडिया ए, अंडर-19 विश्वकरंडक खेळलो आहे. माझा हा प्रवास चांगला राहिला. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. तेव्हा विचार केला नव्हता की, मी इतकं पुढे जाईन. मी नशिबवान आहे की, मला याचा भाग होता आला. मला क्रिकेट शिवाय काही माहिती नाही. मी भारतीय क्रिकेटमध्ये एक छोटीशी छाप सोडली. आता मी अमेरिकेच्या बाबतीत देखील असे पाहत आहे.

प्रश्न - 2012 विश्वकरंडक स्पर्धेवरुन परतल्यानंतर तुला लवकरच भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल, याची आशा होती का?

उत्तर - होय, देशासाठी खेळण्याची प्रत्येकाचे स्वप्न असते. कोण अंडर-19 क्रिकेटर देशासाठी खेळू इच्छिणार नाही. हा काळ माझ्यासाठी खूप कठीण राहिला. माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल सुरू होते. हे तुम्ही सर्व जाणता. खूप साऱ्या चर्चा होत्या. क्रिकेट नशिबाचा एक मोठा भाग असतो, ही बाब सर्वजण जाणतो. देशासाठी खेळणे सर्वाची इच्छा असते. यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. सर्व घडतं ते नशिबाने. आपण आखलेल्या योजनासारखं काही घडतं नाही.

प्रश्न - तुला वाटतं का, भारतीय सिनियर्स सोबत थोडी आणखी संधी दिल्याने, फरक पडू शकला असता का?

उत्तर - मी जेव्हा पाठीमागे वळून पाहतो. तेव्हा मला निश्चितपणे वाटतं की, तुम्ही एका दौऱ्यात असता तेव्हा सिनियर्स सोबत खांद्याला खांदा लावून चालता. तेव्हा गोष्टी वेगळ्या नसतात. पण जेव्हा तुम्ही वारंवार हाच विचार करता की काय असे होते. प्रत्यक्षात जगणे चांगले असते. आपण खूप साऱ्या गोष्टीबद्दल विचार करतो. पण मी त्या ठिकाणी जाऊ इच्छित नाही.

प्रश्न - तु अमेरिकेत तुझ्या करियर विषयी काय विचार केलास?

उत्तर - मी अमेरिकेतील करियरमधील बदलाबद्दल वास्तविक आशावादी आहे. हे चांगलं ठिकाण आहे. मला काही वेगळं वाटत नाही. परिसरात खूप सारे भारतीय आहेत. त्यामुळे असं वाटत की, तुम्ही अमेरिकेत भारतीयांसाठी खेळत आहात. मला विश्वास आहे की, पुढील काही वर्षात अमेरिकेचे क्रिकेट समृद्ध होईल. प्रमुख लीग पुढील वर्षी सुरू होणार आहे. ही लीग अमेरिका क्रिकेटसाठी नक्कीच बुस्टर आहे.

प्रश्न - तुला वाटत आणखी काही भारतीय क्रिकेटर अमेरिकेला जातील?

उत्तर - तुम्ही जर अमेरिकेला पाहिलं तर जगातील अनेक खेळाडू तिथं येत आहेत. मी भारतीय खेळाडूंबाबतीत सांगू शकत नाही. परंतु जगभरातील खेळाडू येथे येत आहेत.

प्रश्न - तु मेजर लीग क्रिकेट आणि मायनर लीग क्रिकेटची किती तयारी केली आहेस?

उत्तर - मेजर लीग क्रिकेट स्पर्धेला अद्याप खूप काळ बाकी आहे. पुढील वर्षी या स्पर्धेची प्रदर्शनी होऊ शकते. 2023 मध्ये एक संपूर्ण प्रमुख लीग स्पर्धेचे आयोजन होईल. मायनर लीग क्रिकेट सुरू आहे. माझे हे सुरूवातीचे दिवस आहे. मी सेट होत आहे, संघ चांगली कामगिरी करत आहे.

प्रश्न - तु भारतीय क्रिकेटसोबत कायम जोडलेला राहणार आहेस का?

उत्तर - मी येथे आहे, पण भारतासोबत जोडलेला आहे. आजकाल क्रिकेट इतके ग्लोबल झाला आहे की, वास्तवात जग जवळ आलं आहे. वाटत नाही की, तुम्ही कुठे दूर आहात. मी भारतासोबत असा जोडला गेलेलो आहे की, मला वाटतंच नाही की मी, भारतीय क्रिकेट सोडलं आहे. कारण अमेरिकेत खूप सारे भारतीय आहेत. यामुळे मला वाटत नाहीये की मी भारतापासून दूर आहे. यामुळे तुम्ही येथे असा की तिथे असा काही फरक पडत नाही.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वकरंडक जिंकण्यासाठी सक्षम - रिकी पाँटिग

हेही वाचा -यूपी सरकारचा टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details