ढाका : बांगलादेशच्या संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने ( wicketkeeper-batter Mushfiqur Rahim ) मोठी घोषणा केली आहे. मुशफिकुर रहीमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला ( Mushfiqur Rahim retires from T20I cricket ) आहे. निवृत्तीची घोषणा करताना उजव्या हाताचा फलंदाज मुशफिकुर रहीमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, मी आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर करू इच्छितो आणि खेळाच्या कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी फ्रँचायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दोन फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे.
बांगलादेशचा संघ आशिया कप 2022 मधून बाहेर पडला ( Bangladesh team out of Asia Cup 2022 ) आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध साखळी फेरीतील दुसरा सामना गमावल्याने बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. आशिया कपच्या 15 व्या मोसमात बांगलादेशच्या संघाची कामगिरी खराब झाली होती. यादरम्यान मुशफिकुर रहीमही सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहिला. त्याने दोन सामन्यात एकूण 5 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्ध तो 4 चेंडूत 1 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्या बॅटने 5 चेंडूत 4 धावा केल्या.