नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत ८वा महिला विश्वचषक खेळला जात आहे. आज रात्री बांगलादेश आणि श्रीलंका संघ आमनेसामने असतील. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर रात्री 10.30 वाजता सामना सुरू होईल. पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 3 धावांनी पराभव करून श्रीलंकेने आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या मैदानावर महिला टी-20 चे 6 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने एक सामना जिंकला.
हेड टू हेड : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील गेल्या पाच सामन्यांमध्ये श्रीलंकेचे वर्चस्व राहिले आहे. श्रीलंकेने पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. जागतिक क्रमवारीत श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा संघ 9व्या क्रमांकावर आहे. केपटाऊनमध्ये पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहील आणि तापमान 18 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. रात्री ढगाळ वातावरण राहील. रात्री दव पडण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेचा संघ: चमारी अथापथु (कर्णधार), ओशादी रणसिंघे, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डिसिल्वा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी, कौशिनी नुथंगना, मलशा शेहानी, इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी, अचिनी तारुणिका, अचिनी कुलास, विनिमा गुलास, सत्य सांदीपनी.बांगलादेश संघ :निगार सुलताना जोटी (कर्णधार), मारुफा अख्तर, फहिमा खातून, सलमा खातून, जहाँआरा आलम, शमीमा सुलताना, रुमाना अहमद, लता मंडोल, शोर्ना अख्तर, नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, रितू मोनी, दिशा बिस्वास, हक ज्युनियर फरगाना.
97 धावांनी पराभव :महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी, 11 फेब्रुवारी रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे रात्री 10.30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाने किवी संघाचा बँड वाजवला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा 97 धावांनी पराभव केला. महिला टी-20 च्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात ऍशले गार्डनरने चांगली गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. यासाठी ऍशले गार्डनरला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.
70 धावांची भागीदारी : या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 173 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 174 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचवेळी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ 14 षटकांत 76 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात ऍशले गार्डनरने उत्कृष्ट फॉर्ममध्ये गोलंदाजी करत 3 षटकात केवळ 12 धावा देत 5 बळी घेतले. ॲशले गार्डनरने या सामन्यातील उत्तम कामगिरीसाठी सामनावीराचा ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची सुरुवात काही खास नव्हती. बेथ मुनी पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर अॅलिसा जीन हिली आणि कर्णधार मेग लॅनिंग यांनी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत आणले.
हेही वाचा :Womens T20 World Cup 2023 : महिला T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; ऍशले गार्डनर चमकला