सेंचुरियन:बांगलादेशचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( SA vs BAN ) संघात वनडे आणि टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वनडे मालिकेतील तिसरा सामना सेंचुरियन येथे पार पडला. हा सामना मालिकेतील शेवटचा सामना होत. ज्यामध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने मात करत ( Bangladesh won by 9 wkts ) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच बांगलादेशने प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर वनडे मालिकेत विजय मिळवला आहे.
बांगलादेशने प्रथम दक्षिण आफ्रिकेला 154 धावांवर सर्वबाद करत रोखले. त्यानंतर फलंदाजी करायाला आल्यानंतर 155 धावांचे लक्ष्य 1 विकेट गमावून 26 षटकांत पूर्ण केले. तसेच बांगलादेशने मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. बांगलादेशकडून कर्णधार तमीम इक्बालने ( Captain Tamim Iqbal ) नाबाद 87 धावा केल्या. तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने 35 धावांत पाच बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर जानेमन मलानने 39 धावा केल्या. तमिम आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 127 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे ( Bangladesh 1st Series Win ). या दौऱ्यापूर्वी संघाने दक्षिण आफ्रिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. सर्व 19 सामन्यांत त्यांचा पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघही जबरदस्त लयीत होता. जानेवारीमध्ये त्यानंनी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 3-0 असा क्लीन स्वीप दिला होता. त्याआधी कसोटी मालिकेतही भारताचा पराभव केला होता. असे असतानाही बांगलादेशला त्यांच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी विजय मिळवून दिला.
तिसर्या सामन्यात यजमान प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरले आणि ते 37 षटकांत 154 धावांवर बाद झाले. सलामीवीर जानेमन मलान ( Opener Jaaneman Malan ) आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या. त्यानंतर मात्र त्यांची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. खालच्या फळीत केशव महाराज (28) आणि प्रिटोरियस (20) यांनी संघाला 154 धावांपर्यंत नेले. मलानने संघाकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 35 धावांत 5 बळी घेतले.
हेही वाचा - Cricketer Yuvraj Singh : युवराज सिंगने गरजू रुग्णांच्या मदतीसाठी हॉस्पिटलला दिले 120 क्रिटिकल केअर बेड्स