डर्बन: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश ( South Africa v Bangladesh ) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, सकाळच्या सत्रात बांगलादेशला 53 धावांवर गुंडाळून 220 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात बांगलादेशचे फलंदाज क्रीझवर फक्त 19 षटकेच टिकू शकले.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात केवळ दोन गोलंदाजांचा वापर केला. ते दोघेही फिरकीपटू होते. डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने ( Spin bowler Keshav Maharaj ) 32 धावांत सात, तर ऑफस्पिनर सायमन हार्मरने 21 धावांत तीन बळी घेतले. अंतिम डावात 274 धावांचा पाठलाग करून बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी विजय नोंदवण्याची आशा बाळगल्यामुळे सामना आश्चर्यचकित झाला.