महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women World Cup : बांगलादेशची पाकिस्तानवर 9 धावांनी मात; सिदरा अमीनची शतकी खेळी ठरली व्यर्थ - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने 9 धावांनी विजय ( Bangladesh Women won by 9 runs ) मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सिदरा अमीनची 104 धावांची खेळी व्यर्थ ( Sidra Amin century was in vain ) ठरली.

Bangladesh
Bangladesh

By

Published : Mar 14, 2022, 4:23 PM IST

हॅमिल्टन (न्यूझीलंड) :आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women's ODI World Cup ) स्पर्धेचा थरार न्यूझीलंड मध्ये सुरु आहे. या स्पर्धेतील बारावा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. सेडन पार्क येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने 9 धावांनी पाकिस्तानचा पराभव ( Bangladesh Women won by 9 runs ) केला. या विजयात फलंदाज फरगाना हक आणि गोलंदाज फहिमा खातून यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला विजयापर्यंत नेले.

पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची फलंदाज हॉकने 115 चेंडूत 71 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी तिने कर्णधार निगार सुलतानासोबत ( Captain Nigar Sultan ) 97 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत झाली. त्याचवेळी निगारचे अर्धशतक हुकले आणि 46 धावांची खेळी खेळताना फातिमा सनाच्या षटकात झेलबाद झाली. यादरम्यान संघाने पन्नास षटकांत सात गडी गमावून 234 धावा केल्या.

पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना नाशरा संधूने फरगाना हक (71), रुमाना अहमद (16) आणि फहिमा खातून (0) यांच्या विकेटसह तीन विकेट घेतल्या. निदा दार, फातिमा सना आणि सोहेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये नाहिदा खानने 43 धावा ( Nahida Khan 43 runs ) केल्या आणि गोलंदाज रुमाना अहमदच्या षटकात झेलबाद झाली. त्याचवेळी दुसरी फलंदाज सिद्रा अमीनने शतक झळकावताना 104 धावांची शानदार खेळी खेळली. ज्यात तिच्या खेळीत आठ चौकारांचा समावेश होता. त्याचवेळी कर्णधार बिस्माह महरूफने ( Captain Bismah Mahroof ) 31 धावांची खेळी करुन गोलंदाज आलमच्या षटकात झेलबाद झाली. या तीन फलंदाजांनंतर संघातील इतर कोणताच फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. सर्व एकापाठोपाठ बाद होत राहिले.

गोलंदाज फहिमा खातूनने तीन आणि रुमाना अहमदने दोन गडी बाद केले. त्याचवेळी जहानारा आलम आणि सलमा खातूनने 1-1 बळी घेतला. गोलंदाजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करताना फलंदाजांना त्यांच्या दबावाखाली ठेवले आणि संघाला 50 षटकांत 225 धावांपर्यंत रोखले.

संक्षिप्त धावफलक:

बांगलादेश:234/7 (शर्मिन अख्तर 44, फरगना होक 71, निगार सुल्ताना 46; नशरा संधू 3/41).

पाकिस्तान:225/9 (नाहिदा खान 43, सिदरा अमीन 104, बिस्माह मारूफ 31; फहीमा खातून 3/38, रुमाना अहमद 2/29).

ABOUT THE AUTHOR

...view details