महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ban Vs Eng T20 : बांगलादेशचा मोठा उलटफेर! विश्वविजेत्या इंग्लंडला हरवून जिंकली टी २० मालिका! - बांगलादेश इंग्लंड टी 20

बांगलादेशने विश्वविजेत्या इंग्लंडला हरवून मोठा अपसेट केला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा टी 20 सामना 14 मार्चला मीरपूरमध्ये खेळला जाणार आहे. बांगलादेश पुढच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.

Ban Vs Eng T20
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड

By

Published : Mar 13, 2023, 6:50 AM IST

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत बांगलादेशने सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. बांगलादेशने कालचा सामना 4 विकेटने जिंकला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने 20 षटकात केवळ 117 धावा केल्या. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 28 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. बेन डकेटने 28 चेंडूत सर्वाधिक 28 धावा केल्या. याशिवाय फिल सॉल्टने 19 चेंडूत 25 धावा ठोकल्या. त्याचवेळी मोईन अलीने 17 चेंडूत 15, सॅम करनने 16 चेंडूत 12 आणि रेहान अहमदने 11 चेंडूत 11 धावा केल्या.

मेहदी हसन प्लेअर ऑफ द मॅच : बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 4 षटकात 12 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेत चमकदार कामगिरी केली. मिराजला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही देण्यात आला. तर तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शाकिब अल हसन आणि हसन महमूद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेश संघाने 118 धावांचे लक्ष्य 18.5 षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात नजमुल हुसेन शांतोने 47 चेंडूत नाबाद 46 धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. त्याचवेळी मेहदी हसन मिराजने 16 चेंडूत 20 आणि तौहीद हृदयने 18 चेंडूत 17 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 बळी घेतले.

पहिल्या सामन्यातही शानदार विजय : या आधी 9 मार्च रोजी बांगलादेशच्या चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव करून मोठा उलटफेर केला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 6 गडी गमावून 156 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 42 चेंडूत 67 धावांची धडाकेबाज खेळी केली. या डावात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले होते. यानंतर बांगलादेशने 18 षटकांत 157 धावांचे लक्ष्य गाठले आणि मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात केली. बांगलादेशकडून नजमुल हसनने 30 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :Usman Khan Fastest Century : उस्मान खानने पीएसएलमध्ये रचला इतिहास, ठोकले सर्वात वेगवान शतक

ABOUT THE AUTHOR

...view details