दुबई - पाकिस्तानचा युवा कर्णधार बाबर आझमने भारतीय संघाचा अनुभवी कर्णधार विराट कोहलीला जबर धक्का दिला आहे. बाबरने विराटकडून एकदिवसीय क्रिकेटमधील 'नंबर वन'चे सिंहासन पळवले आहे. बाबरने एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केले आहे. विराट एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत तब्बल १२५८ दिवस अव्वलस्थानावर होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बाबर आझमने दमदार खेळ केला. त्याला या कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात बाबर ८६५ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तो कर्णधार विराट कोहलीपेक्षा ८ गुणांनी पुढे आहे. विराट या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
अशी कामगिरी करणारा बाबर पाकिस्तानचा चौथा खेळाडू -